Breaking News

'त्या' क्लिपमधील आवाज माझा नाही - आरोग्यमंत्री

The voice in 'that' clip is not mine - Health Minister

        गंधवार्ता वृत्तसेवा, दि. 17 फेब्रुवारी 2021- मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्या बाबातची ऑडिओ क्लिप, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सदरची ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत असून, त्या क्लिपमधील आवाज त्यांचा नसल्याचे जाहीर केले आहे.

        ठीकठिकाण होत असणारी लग्न, कार्यक्रम तसेच कोचिंग क्लास येथे पोलिसांना रेड करण्याचे आदेश देऊन, मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात विरोधात कारवाई करण्याबाबतचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिल्याबाबत एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सदरची क्लिप ऑडिओ क्लिप ही त्यांची नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मास्क न वापरणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने  व्हायरल होत आहे, मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.

No comments