मातोश्री विकास सोसयटीकडून सभासदांना आ. दीपक चव्हाण यांच्या हस्ते लाभांश वाटप
![]() |
लाभांश वाटप करताना आमदार दिपक चव्हाण, डी. के. पवार, शंकरराव माडकर, नितीनराव भोसले |
साखरवाडी - मातोश्री विकास सोसायटी पिंपळवाडी साखरवाडी या संस्थेच्या सभासदांना ७ टक्के लाभांश वाटप आमदार दिपकराव चव्हाण यांचे शुभहस्ते व संस्थेचे चेअरमन आणि महानंदा डेरी मुंबईचे व्हा. चेअरमन डी. के. पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि. १२/११/२०२० रोजी संपन्न झाला . यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सह. साखर कारखाण्याचे व्हा. चे चेअरमन नितीनराव भोसले, कारखान्याचे संचालक अशोक सोनवणे, जिंती चे चद्रकांत रणवरे, अनिल पिसाळ, गणेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती .
या वेळी संस्थेचे संस्थपक चेअरमन डी के पवार यांनी संस्थेच्या कामकाजाची सविस्तर माहिती देऊन संस्थेच्या विकासाबरोबर इतर सामाजीक विकासकामाबाबत निधीची मागणी करताना, गत वर्षात कोरोनासारख्या महाभयंकर संकटामुळे निधी मिळू शकला नाही याबाबत सविस्तर माहिती देऊन सर्व सभासदांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या .
या वेळी आमदार दिपक चव्हाण यांनी संस्थेच्या कामकाजाबावत डी. के. पवार व सहकारी यांचे कौतुक करून गावातील सार्वजनिक विकासकामाबाबत सहकार्य करण्याचे आशवसण दिले. नामदार श्रीमंत रामराजे व संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून साखरवाडीचा कारखाना सुरू केल्याबददल त्यांचे आभार मानले.
उपस्थित सर्वांचे स्वागत व आभाराचे काम आर. बी. भोसले यानी केले. संस्थेचे सचिव राजेंद्र काकडे, उपाध्यक्ष संजय भोसले, विठ्ठल जाधव यांनी लाभांष वाटपाचे काम पूर्ण केले. या वेळी संस्थेचे सर्व संचालक दशरथ जाधव, ह.भ.प प्रकाश पवार महाराज, वसंतराव जाधव, घाडगे साहेब, डी डी वाघमोडे, विठ्ठल रूपनवर, मस्कु आप्पा पिसाळ, अंकुश भोसले, दलात्रय पवार व सभासद मोठया संखेने उपस्थित होते .
No comments