बनावट नोटा व देशी पिस्तूलसह टोळी जेरबंद
सातारा ( गंधवार्ता वृत्तसेवा) - स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पथकाने धडाकेबाज कारवाई करत काळेवाडी, कराड येथे ९४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा व देशी बनावटीची पिस्टल जवळ बाळगणारी टोळी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.
दि.११/११/२०२० रोजी आनंदसिंग साबळे सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना तीन इसम कोळेवाडी ता.कराड जि.सातारा येथील एम.एस.ई.बी सब स्टेशनजवळ एकत्र येणार असून, त्यांचेजवळ भारतीय चलनातील २००० व ५०० रुपये दराच्या बनावट नोटा आहेत अशी गोपनिय बातमी प्राप्त झाली. त्याबाबत श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांना तात्काळ माहिती सांगून त्यांनी दिले आदेशाप्रमाणे प्राप्त झाले बातमीचे ठिकाणी आनंदसिंग साबळे सहायक पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील पथकाने वेषांतर करुन एम.एस.ई.बी.सब स्टेशन परिसरामध्ये सापळा लावला. त्या मुदतीत ३ इसम आले त्यांच्या हलचाली संशयास्पद वाटल्याने, त्यांना हटकले त्यावेळी तीनही इसम पळून जात असताना, पथकातील पोलीस अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांची अंगड़ाडती घेतली असता तीनही इसमांच्या ताब्यात २००० रुपये व ५०० रुपये दराच्या ९४ हजार ५०० रुपये भारतीय चलनातील बनावट नोटा मिळून आल्या. तसेच एका इसमाचे पॅन्टचे कंबरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द कराड तालुका पोलीस ठाणेस गुन्हा नोंद केला आहे.
श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आनंदसिंग साबळे सहायक पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्याखाली पो.हवा.अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो.ना.शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, मयुर देशमुख, पंकज बेसके, विजय सावंत यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
No comments