Breaking News

फलटण एस.टी. सोसायटीकडून सभासदांना डिव्हिडंट वाटप

लाभांश वाटप करताना चेअरमन राहुल कदम,शेजारी सचिव संदिप पवार,श्रीपाल जैन, तानाजी भिवरकर,चव्हाण

            फलटण - कोव्हिड १९ मुळे सर्वत्र आर्थिक टंचाई निर्माण झालेली आहे. एस.टी.कर्मचारी यानां ही वेळेवर पगार नाहीत, या पार्श्वभुमिवर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील याच्यां आवाहनानुसार एस.टी.को ऑफ क्रेडिट सोसायटी फलटण आगार विद्यमान संचालक मंडळाने सातारा जिल्ह्यात प्रथमच  चेअरमन राहुल कदम याच्यां अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंग मधे सर्व सभासद बंधु -भगीनीनां लाभांश वाटपाचा निर्णय घेऊन दिवाळीच्या पार्श्वभुमीवर सभासद बंधुना आर्थिक हातभार लावला.  ६% प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आला. एकूण 173 सभासदांना 4 लाख 73 हजार रुपये करण्यात आले.  

        सोसायटी ने वाटप केलेल्या कर्जाचे हप्ते पगारातील अनियमीतते मुळे होणारा वसुल वेळेवर सोसायटी ला मिळत नसतानाही केवळ सभासदांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत सभासदांना लाभांश वाटप करण्यात आला असे प्रतीपादन चेअरमन राहुल कदम यांनी केले. एस.टी.सोसायटी कडुन लाभांश मिळाल्याने  सभासद बंधुनी समाधान व्यक्त करुन संचालक मंडळास धन्यवाद दिले.

No comments