Breaking News

सातारा जिल्ह्यात 65 कोरोना बाधित तर फलटण मध्ये 2

        सातारा दि.17 -: जिल्ह्यात काल सोमवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 65 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान फलटण तालुक्यात आज 2 व्यक्तींच्या चाचण्या बाधित आल्या आहेत
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 7,बुधवार पेठ 1, सदरबझार 1, ढोणे कॉलनी सातारा 1, करंजे 1, सर्वोदय कॉलनी 1, रविवार पेठ सातारा 4, एमआयडीसी सातारा 2, दिव्यनगरी 1, धावडशी 1,   लिंब 1, कारंडी 1, शिवडी 1, लिंबाचीवाडी 1,  
कराड तालुक्यातील कराड 6, वडगाव 1, घारेवाडी 1, मलकापूर 3, कोयना वसाहत 1, विंग 1,  
पाटण तालुक्यातील पाटण 2, विहे 1, मोरगिरी 1, म्हावशी 1
फलटण तालुक्यातील साखरवाडी 2,
खटाव तालुक्यातील पुसेगाव 2, वडूज 1,
माण  तालुक्यातील राणंद 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,
जावली तालुक्यातील अखाडे 1, भणंग 1, बामणोली 1, केळघर 1,
वाई तालुक्यातील वाई 1, कवटे 1,  
खंडाळा तालुक्यातील लोणंद 3, खंडाळा 4,
इतर नंदगाणे 3,
  3 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  दिव्यनगरी ता. सातारा येथील 90 वर्षीय पुरुष, राणंद ता. माण येथील 54 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये चिंचणेर वंदन ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -220614
एकूण बाधित -48957  
घरी सोडण्यात आलेले -44743  
मृत्यू -1646
उपचारार्थ रुग्ण-2568

No comments