चारित्र्याच्या संशयावरून तिघांना मारहाण तर एकाचा सिमेंटच्या कट्ट्यावर आपटून खून
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ नोव्हेंबर - मुंजवडी येथील सुनीता माने यांच्या सुने बद्दल चारित्र्याचा संशय घेऊन, घरी जाऊन सुनीता माने तसेच त्यांची सून, लहान मुलाला सहा जणांनी कुऱ्हाड, दगड,वीट व लथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच मोठ्या मुलास सिमेंटच्या कट्ट्यावर आपटून त्याचा खून केला आहे. 6 जनांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी पाडव्याच्या दिवशी दिनांक १६/११/२०२० रोजी सायंकाळी ५.०० वा चे सुमारास सुनिता सुनिल माने वय ४० वर्षे व्यवसाय-मजुरी रा.मुंजवडीता फलटण जि.सातारा यांच्या रामोशी आळी, मुंजवडी येथील घरासमोरील अंगणात, १) रोहित दादा खोमणे रा.मुंजवडी ता.फलटण २) आशाबाई ऊर्फ नकुसा अरुण आडके रा. पाटस जि.पुणे ३) दत्तु बबन सितकल रा. मुंजवडी ता. फलटण ४) सुनिल अरुण आडके रा. पाटस जि.पुणे ५) जया बाळु जाधव रा.आसु ता.फलटण ६) अर्चना दादा खोमणे रा. मुंजवडी ता.फलटण यांनी, सुनीता माने यांची सुन कामिनी हिचे चारित्र्याचा संशय घेवून व रोहित दादा खोमणे यास फोन करुन सारखी बोलावते या कारणावरुन चिडुन जावुन, सुनीता माने यांना तसेच त्यांची सुन कामिनी हिस लथाबुक्क्यांनी, दगड विटाने मारहाण केली. तसेच धाकटा मुलगा संकेत यास कु-हाडीने डोकीत मारुन, जखमी केले आहे. तसेच थोरला मुलगा अशिष यास मारहाण करुन जिवे ठार मारण्याच्या उददेशाने सिमेंटचे कट्टयावर आपटुन त्याचा खुन केला असल्याची फिर्याद सुनिता सुनिल माने यांनी दिली आहे. यामध्ये आशीष सुनील माने यांचा खून झाला असून संकेत सुनील माने हे जखमी आहेत.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत. गुन्ह्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
No comments