ताथवड्याच्या घाटात रॉबरी ; 6 लाख 27 हजारांचा मुद्देमाल लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण पुसेगाव रोडवर, ताथवडा घाटात 4 अज्ञात ईसमानी, महिंद्रा पिकअप गाडीला अडवून, जबरी चोरी केली आहे. यामध्ये महिंद्रा पिकअप सह आत मध्ये असणारी गायछाप ची 15 पोती व 25 नारळाची पोती, मोबाइल व रोख रक्कम असा एकूण 6 लाख 27 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अक्षय भगवान निर्मल रा.निढळ ता खटाव जि.सातारा हे पुसेगाव वरून फलटण कडे येत होते. ताथवडा घाटात त्यांचा एका दुचाकी स्वाराने पाठलाग केला. ते ताथवडा घाटातील शेवटच्या वळणावर आले असता, तेथे त्यांच्या पिकअप समोर तीन जणांनी आकाशी रंगाची मारुती कार आडवी लावली. या नंतर पिकमध्ये क्लीनर बाजूने चढून निर्मल यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम व पाच लाख रुपये किंमतीची एम एच ११ सी एच ७७७५ क्रमांकाची महिंद्रा कंपनीची प्याक बॉडी पिकअप, एक लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचे प्रत्येकी २० पुडे असलेली गायछाप तंबाखूची १५ पोती, प्रत्येकी ५० नारळ असलेली २५ नारळाची पोती, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल व दोन हजार रुपये रोख असा एकुण सहा लाख २७ हजार २५० किमतीचा चोरुन नेला. या घटनेची फिर्याद अक्षय निर्मल यांनी दिली आहे.
पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यु एस शेख हे करीत आहेत.
No comments