बारामती येथे 9 जणांविरुद्ध सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बारामती (गंधवार्ता प्रतिनिधी) - बारामती येथील व्यापाऱ्याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी, बारामती येथील नगरसेवकासह 9 व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारामती पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक प्रितम शहा वय ३० वर्षे व्यवसाय व्यापार रा. सहयोग सोसायटी प्लॅट नं.३४ बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या तकारी वरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र. नं. ५६८/२०२० भा.द.वि.क. ३०६,५०६,३४ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे.कमल.३२(१)(२),३९,४५ अन्वये दिनांक १८/११/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असन आरोपी नामे १) जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे रा.भिगवण रोड बारामती २) जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे देशमुख रा.देशमुख वस्ती पाटस रोड बारामती ३) संजय कोंडिबा काटे रा.काटेवाडी ता.बारामती ४) विकास नागनाथ धनके रा इंदापुर रोड ५) मंगेश ओंबासे रा. सायली हिल बारामती एमआयडीसी ६) प्रविण दत्तात्रय गालिंदे रा खाटीक गल्ली बारामती ७) हनुमंत सजेराव गवळी रा.अशोकनगर जैन मंदीराशेजारी बारामती ८) संघर्ष गव्हाळे रा.बारामती ९) सनी उर्फ सुनिल आवाळे रा. खंडोबानगर बारामती यांनी मयत नामे प्रितम शशीकांत शहा यांना व्याजाने पैसे देवुन दिलेल्या पैशाच्या व्याजाचे वसुलीसाठी तसेच सहयोग सोसायटी येथील बंगला व्याजाच्या पोटी नावावर करून घेवुन, मयतास मानसिक त्रास देवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेबाबत, यातील मयत प्रितम शहा यांनी त्यांचे हस्ताक्षरात वरील लोकांची नावे लिहुन सुसाईड नोट करून ठेवलेली होती. त्यावरून मयताचा मुलगा प्रतिक प्रितम शहा याने दिलेल्या तकारी वरून वरील इसमांवरती, बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयात १) जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे रा.भिगवण रोड बारामती २) जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे देशमुख रा. देशमुख वस्ती पाटस रोड बारामती ३) संजय कोंडिबा काटे रा.काटेवाडी ता.बारामती ४) प्रविण दत्तात्रय गालिंदे रा.खाटीक गल्ली बारामती ५) हनुमंत सर्जेराव गवळी रा.अशोकनगर जैन मंदीराशेजारी बारामती ६) सनी उर्फ सुनिल आवाळे रा.खंडोबानगर यांना अटक करण्यात आलेली असुन ७) विकास नागनाथ धनके रा.इंदापुर रोड, ८) मंगेश ओंबासे रा.सायली हिल बारामती एमआयडीसी बारामती ९) संघर्ष गव्हाळे रा. बारामती हे सदर गुन्हयात फरारी आहेत.सदर गुन्हयाचा पुढील तपास डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक सो ,पुणे ग्रामीण, मिलींद मोहिते अपर पोलीस अधिक्षक सो,बारामती, नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो,बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
No comments