Breaking News

वैचारिक परंपरा असणाऱ्या अरुण लाड यांना निवडून द्या; विचार करणारा आमदार विधान परिषदेत शोभून दिसतो - सभापती रामराजे नाईक निंबाळकर

 फलटण येथे बोलताना  विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर 
        फलटण 18 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या बरोबरीने काम करणारे क्रांतीअग्रणी जे डी बापू लाड यांचे चिरंजीव अरुण लाड यांच्या कुटूंबाची पार्श्वभूमी व वैचारिक परंपरा मोठी आहे. विधान परिषदेत वैचारिकतेने काम करणारा आमदार असायला हवा, विचार करणारा आमदार विधान परिषदेत शोभून दिसतो. या साठी अरुण लाड यांना निवडून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी, कार्यरत रहाणे आवश्यक आहे.  या निवडणुकीचे महत्त्व माझ्यासाठी जास्त आहे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते यांनी जोमाने काम सुरू करावे आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे असे आवाहन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 

       पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ फलटण येथे आयोजित करण्यात आलेल्या ' पदवीधर संवाद मेळाव्यात' ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, किरण लाड, डि. के. पवार, नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, सौ. रेश्मा भोसले, काँग्रेसचे युवा नेते सचिन सूर्यवंशी-बेडके, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद नेवसे आदींची यावेळी उपस्थिती होती.

        पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या घराला वैचारीक वारसा आहे. क्रांतीअग्रणी जे. डी. बापू लाड यांचे ते चिरंजीव आहेत. वैचारिक परंपरा असलेल्या घरातील अरुण लाड यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत रहावे असे आवाहन विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 
         पुर्वी या निवडणूकीत ठराविक पक्षाचे वर्चस्व होते. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. फलटण शहर व तालुक्यात मिळून एकंदरीत नऊ हजार मतदान आहे. संजीवराजे यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदार मोठ्या संखेने आहेत. जे मतदार बाहेर आहेत त्यांच्याकडून मतदान करुन घ्यावे लागणार आहे. या निवडणूकीत लाड यांना मतदान करुन घेण्यासाठी नियोजनपुर्वक यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यासाठी गाफिल राहून चालणार नाही. सदर निवडणूकीचे महत्व माझ्या दृष्टीने वेगळे आहे. संपुर्ण सातारा जिल्हा व तालुक्यावर माझे पुर्ण लक्ष राहणार असून आळशीपणा व बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही श्रीमंत रामराजे यांनी या वेळी दिला. 
     स्वागत व प्रास्तविक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी, सुत्रसंचलन भिमदेव बुरुंगले यांनी केले. आभार मिलिंद नेवसे यांनी मानले.

No comments