लक्ष्मीबॉम्ब : खर्या लक्ष्मी समवेत अक्षय व किआरा
गंधवार्ता वृत्तसेवा (दि.18 ऑक्टोबर 2020) - कपिल शर्मा शो च्या सेट वर लक्ष्मीबॉम्ब चित्रपटाची टीम प्रोमोशनसाठी आली होती. त्याप्रसंगी खऱ्या लक्ष्मी समवेत म्हणजेच लक्ष्मी नारायण त्रिपाठी समवेत काढलेला फोटो अभिनेते अक्षय कुमार यांनी ट्विटर वर शेअर केलाय. सोबत लक्ष्मीबॉम्ब ची हिरोईन किआरा अडवाणी देखील आहे.
तिघांचा नेहमीच क्राऊड नसतो! असे म्हणत खऱ्या लक्ष्मी समवेत काढलेला फोटो अक्षय कुमार यांनी शेअर करून, टीम लक्ष्मीबॉम्ब, खऱ्या लक्ष्मी समवेत, कपिल शर्मा शोच्या सेट वर! असे ट्विट केले आहे.
लक्ष्मी बॉम्ब चा ट्रेलर नुकताच प्रसारित करण्यात आला होता. आज चित्रपटातील, बुर्ज खलिफा हे टायटल सॉन्ग रिलीज करण्यात आले. रिलीज झाल्यानंतर 4 तासातच या गाण्याला 4 लाखांपेक्षा जास्त विव्हज मिळाले आहेत. हे गाणे अक्षय व किआरा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. लक्ष्मीबॉम्ब चित्रपट एक हॉरर कॉमेडी असून, याचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केले आहे.
No comments