Breaking News

सातारा जिल्ह्यात 181 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

        सातारा दि. 18 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 181  नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 57  जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, पानमळेवाडी येथील 1, फलटण येथे 20, मायणी येथे 4, पिंपोडा 9 असे एकूण 57 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 171511
एकूण बाधित -- 43511
घरी सोडण्यात आलेले -- 36397
मृत्यू -- 1430
उपचारार्थ रुग्ण -- 5499

No comments