विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा सातारा जिल्हा दौरा

Leader of Opposition Pravin Darekar's visit to Satara district
सातारा दि. 18 -: महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढालप्रमाणे.
गुरुवार दि. 22 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 8.30 वा सातारा विश्रामगृह येथून ता. जावळी कडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 9 वा. जावळी येथे आगमन व रिटकवली येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी. सकाळी 10 वा. सातारा ग्रामीण येथे आगमन व राखीव. गाजवडी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी. सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी सातारा येथे आगमन व जिल्हाधिकारी/कृषी अधीक्षक यांचे समवेत चर्चा. स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. दुपारी 12.30 वा. पत्रकार परिषद. स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. दुपारी 1 वा. सातारा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वा. सातारा शासकीय विश्रामगृह येथून वाई ग्रामीणकडे शासकीय वाहनाने प्रयाण. दुपारी 3 वा. वाई ग्रामीण येथे आगमन व चिखली व मालतपूर येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी. सायं. 4 वा. महाबळेश्वर ग्रामीण येथे आगमन व आब्रळ, राजपुरी येथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी. 4.30 वा. राजपुरी येथून महाबळेश्वर कडे शासकीय वाहनाने प्रयाण. 6.30 वा. महाबळेश्वर येथे आगमन व राखीव व मुक्काम.
No comments