जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी ; सरकारने फक्त सर्वे पुरते मर्यादित राहू नये - देवेंद्र फडणवीस
Jalyukt Shivar's must be investigated - Devendra Fadnavis
गंधवार्ता वृत्तसेवा (दी. 20 ऑक्टोबर 2020) - जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी. यातील कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेले नाही. स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरीचे अधिकार होते. ६ लाखांवर कामे झाली आहेत. ही सर्व कामे विकेंद्री पद्धतीने झाली आहेत. 1 लाख ते 5 लखपर्यंत ही कामे आहेत, त्यमुळे ती स्थानिक पातळीवरच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मंजूर झाली होती. 6 लाख कामांमध्ये ७०० तक्रारी म्हणजे हे प्रमाण अत्यल्प आहे. सरकारला जर असे वाटत असेल, चौकश्या लावून विरोधी पक्ष नेत्याचे तोंड बंद करता येईल तर त्यांनी ते विसरून जावे, विरोध पक्षनेता हा जनतेचा आहे ,आणि तो जनतेकरता काम करीत राहणार असल्याचे सांगतानाच कोरोंना संपल्यानंतर जळयुक्त शिवार ने किती फायदा झाला ते जनते समोर आणणार असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत संगितले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोलापूर, उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला.
मोबाईल ने फोटो काढून पाठवलेले पंचनामे ग्राह्य धरावेत
१ ते १४ ऑक्टोबर या काळात मोठा पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. कापणीला आलेली पिके आणि कापलेली पिके दोन्हींचे मोठे नुकसान झाले आहे, प्रचंड मोठी अतिवृष्टी झालेली आहे, उंडवडी तालुका बारामती येथे तर गुरांना चारा देखील शिल्लक नाही, सर्वत्र पाणी शेतामध्ये पाणी साचले आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्व पिके वाहून गेले आहेत, विहिरी मध्ये गाळ साठला आहे, ड्रिप इरिगेशन वाहून गेले आहेत, यासाठी सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. आमच्या वेळी साध्या मोबाईल ने फोटो काढून पाठवले तरी पंचनामे ग्राह्य धरले जात होते, त्याच पद्धतीने आत्ताही पंचनामे ग्राह्य धरावेत. म्हणजे त्या आधारावर शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात शेतकऱ्यांना तात्काळ मदत देता येईल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
सरकारने फक्त सर्वे पुरते मर्यादित राहू नये - देवेंद्र फडणवीस
आपत्तीग्रस्त नागरिकांची घरांची पडझड झाली आहे. त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली पाहिजे आपत्तीग्रस्त घरांच्या पडझडीचा विषय असेल तर तत्काल निधी दिला जावा, काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील या भागाचा दौरा केला होता परंतु कोणताही दिलासा शेतकऱ्यांना मिळाला नाही. खरं म्हणजे आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना संधी आहे, ते जे पूर्वी वारंवार मागणी करत होते ते पूर्ण करण्याची संधी आहे. असे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय म्हटले होते याची व्हिडीओ क्लिप सादर केली. आणि म्हटलं त्यांनी जी मागणी केली होती ती, पूर्ण करण्याची संधी आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहे. त्यावेळी मी काळजीवाहू मुख्यमंत्री होतो तरीही केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मी दहा हजार कोटीची तरतूद केली होती. जर सरकारमध्ये इच्छाशक्ती असेल तर या शक्तीचा वापर करून सरकार निश्चितपणे मदत करू शकते, सरकारने फक्त सर्वे करण्यापुरते मर्यादित न राहता काहीतरी तरतूद करावी असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केले.
No comments