Breaking News

आंदरुड येथे ३० वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या

 

       Suicide of a youth from Andrud, Phaltan
फलटण दि. ४  सप्टेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - : आंदरुड ता.फलटण येथील ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण समजले नाही. 
          याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत बरड पोलीस दूरक्षेत्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,  आंदरुड ता. फलटण येथील सावता केरु राऊत (वय ३०) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. याबाबतची फिर्याद चुलत बंधू नितीन राऊत यांनी बरड पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. 
       या घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे पाठविण्यात आला आहे. 
 बरड पोलीस दूरक्षेत्रातील हवालदार मोहन हांगे अधिक तपास करीत आहेत.


No comments