कोरोना रुग्ण सापडल्याने निंबळक गावठान बंद

निंबळक दि. 4 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - गेली अनेक महिने निंबळक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव कोरोना पासुन चार हात लांब होते, परंतू काहि दिवसापासुन निंबळक मध्ये कोरोनाने शिरकाव केला. निंबळकच्या वाड्या-वस्त्यावर हे प्रमाण अत्यंत अल्प होते. परंतू आज गावठाण भागात एका दिवसात दोन कोरोना रुग्ण सापडल्याने निंबळक ग्रामस्थांची धडधड वाढली.
या पार्श्वभूमिवर निंबळक गावठाण भाग पूर्ण लाॅक करण्यात आला आहे. बाजारपेठ काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. या भागातील रस्ते ग्रामपंचायती द्वारे बंद करण्यात आले असून नागरिकांच्या येणे जाण्यावर निर्बंध घातले आहेत.
No comments