Breaking News

28 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात ; शहरात 10, ग्रामीण भागात 18

 

फलटण 4 सप्टेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आज दि. 4 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात एकूण 28 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरात 10 रुग्ण व ग्रामीण भागात 18 रुग्णांचा समावेश आहे.  आज जाहीर केलेले अहवाल हे दि. 3 सप्टेंबर  या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

दि. 3 सप्टेंबर रोजी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलेल्या (RT-PCR) चाचण्यांमध्ये 28 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील 10 व्यक्ती व ग्रामीण भागातील 18 व्यक्तींचा समावेश आहे.
 
यामध्ये
फलटण शहरात लक्ष्मीनगर येथे 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये 20 वर्षीय पुरुष 49 वर्षीय, 52 वर्षीय, 61 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
मलटण येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 10 वर्षीय, 16 वर्षीय, 50 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
मंगळवार पेठ येथे 25 वर्षीय पुरुष, पोलीस स्टेशन फलटण येथे 30 वर्षीय महिला, विद्यानगर फलटण येथे 54 वर्षीय पुरुष यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागात पवारवाडी येथे 8 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, यामध्ये 10 वर्षीय, 16 वर्षीय, 33 वर्षीय, 40 वर्षीय, 46 वर्षीय, 75 वर्षीय महिला, 42 वर्षीय 56 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

 खराडेवाडी येथे 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 9 वर्षीय, 60 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय, 45 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
 
काळज येथे 50 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालक, माळेवाडी येथे 58 वर्षे पुरुष, बरड येथे 28 वर्षीय पुरुष, फरांदवाडी येथे 82 वर्षीय महिला, कोळकी येथे 50 वर्षीय महिला 
 यांच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.

No comments