डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती फलटणच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी 6 बेड्स
![]() |
6 बेड्स सुपूर्द करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे पदाधिकारी |
फलटण दि. 4 सप्टेंबर ( गंधवार्ता वृत्तसेवा) - कोविड १९ चा फलटणमध्ये वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती फलटणच्या वतीने 6 बेड्स देण्यात आले. यामध्ये ६ काॅट, गाद्या, उशी, बेडसीट समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती फलटणच्या वतीने रुग्णांच्या सेवेसाठी उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे 6 बेड्स सुपूर्द करण्यात आले आहेत. यावेळी जेष्ठ नेते मधुकर काकडे, नगरसेवक सचिन अहिवळे, चेअरमन सुधीर अहिवळे, बहुजन चॅनलचे संपादक सनी काकडे, जयंती समितीचे माजी अध्यक्ष शाम अहिवळे, संजय गायकवाड तसेच सन २०२०चे जयंती समितीचे प्रमुख शिवेंद्रराज कांबळे, बंटी साबळे, सम्राट अहिवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अगोदर कोरोना पॉझिटीव्हच्या बातम्या यायच्या, आता अनेक माणसांच्या मृत्यूच्या बातम्या कानावर येवू लागल्या आहेत. रुग्णांना हॉस्पिटल, बेड मिळत नाही. रुग्ण उपचारा अभावी मरतोय, एक पेशंट सापडला की सगळं घर कोरोना पॉझिटिव्ह होतंय. आधी कोरोना शहरा शहरात सापडायचा, आता वार्डा वार्डात सापडतोय. उद्या येणारी परिस्थिती गंभीर स्वरूपाची असणार आहे औषधे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे सगळीकडे साहित्याचा तुटवडा आहे. कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कामाचा ताण खूप आहे. त्यामुळे घराबाहेर कुणी सुरक्षित नाही, म्हणून अजुनही वेळ गेलेली नाही, सावध व्हा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नियम पाळा, आणि कोविड 19 च्या रुग्णांना उपचारा अभावी जीव गमवावा लागणार नाही, यासाठी मदत करा! असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती फलटणच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments