आजारपणास कंटाळून ४० वर्षीय महिलेची पेटवून घेवून आत्महत्या

40-year-old woman commits suicide due to illness
फलटण दि. ४ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - : काळुबाईनगर मलठण ता. फलटण येथील एका ४० वर्षीय महिलेने आजारपणास कंटाळून पेटवून घेवून आत्महत्या केली असल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगल दिलीप डफळ (वय ४० रा. काळुबाईनगर, मलठण ता.फलटण) यांनी दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजणेच्या दरम्यान काळूबाईनगर मलठण ता.फलटण येथील पत्र्याचे शेडमधील स्वयंपाक घरामध्ये आजार पणाला कंटाळून गॅसच्या सहाय्याने स्वतःस पेटवून घेतले व त्यात त्या मयत झाल्या आहेत.
याबाबत मनोज ज्ञानेश्वर लांडगे (वय ४४ रा. काळुबाईनगर मलटण ता. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार भोईर अधिक तपास करीत आहेत.
No comments