Breaking News

कंगना रणौत विरोधात विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव

        Proposal of infringement in the Legislative Council against Kangana Ranaut
        मुंबई: मुंबई विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात काँग्रेसनं विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हा प्रस्ताव मांडला.
        कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. मुंबई मला पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी वाटतेय. मला असुरक्षित वाटत आहे,' असं ती म्हणाली होती. कंगनानं मुंबईची बदनामी केल्याचं सांगत काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. हक्कभंग समितीच्या अनुपस्थितीत मी स्वत: यावर निर्णय घेईन, असं श्रीमंत रामराजे नाईक - निंबाळकर यांनी सांगितलं.
  काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी शिवसेनेकडून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. दरम्यान, गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगना रणौत विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.

No comments