ड्रग्स प्रकरणी कंगनाचा संबंध आहे का? याची माहिती मुंबई पोलीस घेणार

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचं सांगितलं आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
आपल्या बेजबाबदार विधानातून महाराष्ट्र,मुंबई व मुंबई पोलिसांचा अवमान करत असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले. अशा महाराष्ट्राचा जर कोणी अवमान केला तर राज्यातील जनता कधीही सहन करणार नाही असे मत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत व्यक्त केले.
No comments