Breaking News

…तर कायमची मुंबई सोडून देईन - कंगना रणौत

 

      … Then I will leave Mumbai forever - Kangana Ranaut

  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचं सांगितलं आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ट्विट केलं असून आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचं आवाहन दिलं आहे. तसंच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु असंही ती म्हणाली आहे.

        कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय”.

No comments