Breaking News

पुण्यात अँब्युलन्सअभावी पत्रकाराचे निधन

 

           Journalist dies due to lack of ambulance in Pune
 पुणे: पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं करोनामुळं बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नव्यानं उभारण्यात आलेल्या कोविड केअर रुग्णायात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडत चालली असताना खासगी रुग्णालयात त्यांना उपचार घेता यावेत यासाठी पुण्यातील पत्रकारांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते आपल्या सहकारी मित्राचा जीव वाचवू शकले नाहीत. सध्याच्या परिस्थितीत वेळेत सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा पुण्याच्या पत्रकारिता वर्तुळात सुरु आहे. 
            रायकर हे टीव्ही ९ या वृत्तवाहिनीत कार्यरत होते. करोनाकाळात ते सातत्यानं फिल्डवर होते. याच काळात त्यांना संसर्ग झाला होता. प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी त्यांनी करोना चाचणी करून घेतली. त्यात ते पॉझिटिव्ह आले. रविवार, ३० ऑगस्ट रोजी रात्री पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी त्यांची ऑक्सिजन पातळी ७८ पर्यंत खाली गेली होती. त्यामुळं त्यांना इतरत्र हलवण्यासाठी कार्डिअॅक अँब्युलन्सची गरज होती. जी अँब्युलन्स मिळाली त्यातील व्हेंटिलेटर खराब होते, तर दुसऱ्या एका अँब्युलन्समध्ये डॉक्टरच उपलब्ध नव्हते. हे सगळ्या गोंधळामुळं उशीर होत गेला आणि पांडुरंग यांची प्रकृती जास्तच खालावत गेली. शेवटी अँब्युलन्स मिळाली खरी पण तोपर्यंत उशीर झाला होता.
        पत्रकार पांडुरंग रायकर हे 42 वर्षांचे होते, त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे.
 


No comments