Breaking News

72 पॉझिटिव्ह दिवसभरात ; फलटण तालुक्यात कोरोनाचा वाढता आकडा ; शहरात 33, ग्रामीण भागात 39

 
72 corona positive in Phaltan taluka today 33 in urban areas, 39 in rural areas

        फलटण 27 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आज दि. 27 ऑगस्ट 2020 रोजी दिवसभरात जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात एकूण 72 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरात 33 रुग्ण व ग्रामीण भागात 39 रुग्णांचा समावेश आहे. आज सकाळी जाहीर केलेले 21 व्यक्ती व आज सायंकाळी जाहीर केलेले 51 व्यक्ती असे मिळून एकूण 72 कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज आलेले अहवाल हे दि. 24 ऑगस्ट,  25 ऑगस्ट व 26 ऑगस्ट या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

दिनांक 24 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल पुढीलप्रमाणे 

        दि. 24 रोजी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलेल्या चाचण्यांमध्ये 2 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
फलटण शहरातील संजीवराजे नगर येथील 30 वर्षीय पुरुष व माळेवाडी तालुका फलटण येथील 65 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दिनांक 25 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल पुढीलप्रमाणे 

        दि. 25 रोजी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलेल्या चाचण्यांमध्ये 49 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये फलटण शहरात एकूण 20 रुग्णांचा समावेश आहे.  यामध्ये मंगळवार पेठ येथे 9 रुग्ण आहेत. यामध्ये 8 वर्षीय, 14 वर्षीय मुलगा, 52 वर्षीय, 18 वर्षीय,38 वर्षीय, 64 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय, 34 वर्षीय 20 वर्षीय महिला महिलांचा समावेश आहे.

भडकमकर नगर येथे 5 पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. यामध्ये 33 वर्षीय, 60 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय, 6 वर्षीय, 54 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
 लक्ष्मीनगर येथे 2 रुग्ण सापडले असून यामध्ये 18 वर्षीय, 24 वर्षे महिलांचा समावेश आहे. कसबा पेठ येथे 16 वर्षीय महिला, रविवार पेठ येथे 27 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथे 42 वर्षे पुरुष, मेटकरी गल्ली येथे 3 वर्षीय बालिका पॉझिटिव्ह सापडली आहे.  https://www.gandhawarta.com/

फलटण ग्रामीण भागात 29 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये
 वाठार निंबाळकर येथे 9 व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 21 वर्षीय, 11 वर्षीय,37 वर्षीय, 44 वर्षीय,46 वर्षीय, 49 वर्षीय महिला, 24 वर्षीय, 8 वर्षीय, 54 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे

साखरवाडी येथे 7 व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 8 वर्षीय,25 वर्षीय, 28 वर्षीय, 31 वर्षीय महिला, 5 वर्षीय, 30 वर्षीय, 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कोऱ्हाळे येथे 4 व्यक्तींच्या चाचण्या कोविड पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 11 वर्षीय, 40 वर्षीय, 48 वर्षीय महिला, 45 पुरुषाचा समावेश आहे

कोळकी येथे 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये ते 48 वर्षे, 60 वर्षीय, 73 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.  https://www.gandhawarta.com/

गिरवी येथे 15 वर्षीय महिला,आसू येथे ते 30 वर्षीय पुरुष, विडणी येथे 14 वर्षीय मुलगी, बीबी येथे 60 वर्षीय महिला, बिरदेवनगर जाधववाडी येथे 38 वर्षीय पुरुष, तरडगाव येथे 80 वर्षीय पुरुष यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची  माहिती  उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल पुढीलप्रमाणे 

दि. 26 रोजी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलेल्या चाचण्यांमध्ये 21 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये फलटण शहरात एकूण 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 5 महिन्यांचे बालक,  43 वर्षीय,  36 वर्षीय,  80 वर्षीय,  57 वर्षीय,  58 वर्षीय, 39 वर्षीय व इतर 3 पुरुष, 7 वर्षीय बालिका,32 वर्षीय महीला यांचा समावेश आहे. https://www.gandhawarta.com/

फलटण ग्रामीण भागात 9 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये
कांबळेश्वर येथे 30 वर्षीय महिला, साखरवाडी येथे 65 वर्षीय महिला, वाघोशी येथे 23 वर्षीय पुरुष, निंबळक येथे 23 वर्षीय पुरुष, फरांदवाडी येथे 40 वर्षीय पुरुष, सरडे येथे 56 वर्षीय पुरुष, कोळकी येथे 57 वर्षीय पुरुष, रावडी बुद्रुक येथे 30 वर्षीय पुरुष, वडजल येथे 79 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची  माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

2 comments: