Breaking News

अत्यावश्यक सेवेसाठी फलटणमध्ये सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल नॉन कोविड ठेवणे गरजेचे - डॉ. जे. टी. पोळ

 

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -   अत्यावश्यक सेवेसाठी फलटण मध्ये एक हॉस्पिटल नॉन कोव्हीड ठेवणे गरजेचे आहे. जिथे जीव वाचवण्याचे काम केले जाईल असे हॉस्पिटल प्रशाशनाने ठेवावे. सध्या कोरोना काळात, लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये जावून मी पण पेशंटना ट्रीट करतो. सगळी हॉस्पिटल अधिग्रहण करणे चुकीचे आहे. तालुक्याच्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नॉन कोव्हीड म्हणून ठेवणे गरजेचे आहे. जर शासनाने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही अत्यावसेवक सेवा २४ तास सुरू ठेवू व रुग्णांची सेवा करू. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या विनंतीला मान देवून ५० बेडचे कोव्हीड रुग्णालय सुरु करण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे व या पुढेही सहकार्य कायम करणार असल्याचे फलटण येथील निकोप हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ. जे. टी. पोळ यांनी सांगितले.  

        फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले होते. परंतु निकोप हॉस्पिटल शासनास कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत शासनाकडून  निकोप हॉस्पिटल सील करण्यात आले या पार्श्वभूमीवर डॉ. जे. टी. पोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपली बाजू मांडली.

        कोव्हीड रुग्णालयासाठी नर्सिंग कॉलेजची इमारत सुरवातीला पहिली होती. त्या नंतर शिंगणापूर रोडला कोरोना रुग्णालय सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर त्यासाठी निकोप हॉस्पिटलने सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे. सरकारी रुग्णालांमध्ये आम्ही सद्य स्थितीत सेवा देतच आहोत व ह्या पुढी सेवा देण्यास कायम तत्पर राहू. आमचे हॉस्पिटल अधिग्रहण करताना, कुठलाही निकष लावला नाही. आमच्या इथे मी एकच फिजिशियान आहे. रहिवाशी कॉम्प्लेक्स मध्ये कोरोना रुग्णालय करणार का ? नॉन कोव्हीड असलेल्या रुग्णांचा फलटणमध्ये पाच तालुक्याचा भार येत असतो. गरीब रुग्णांना आम्ही मोफत उपचार करतो. जर महात्मा फुले योजनेत बसत नसतील तर त्यांना हि आपण मोफत उपचार करीत असतो. त्या मुळे आमचे हॉस्पिटल नॉन कोव्हीड पेशंट साठी चालू ठेवण्यात यावे एवढीच आमची विनंती आहे अशी प्रतिक्रिया डॉ. जे. टी. पोळ यांनी दिली.


No comments