फलटण तालुक्यात आज 21 कोरोना पॉझिटिव्ह ; शहरात 12, ग्रामीण भागात 9

Today in Phaltan taluka there are 21 corona positive cities 12, in rural areas 9
फलटण 27 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज दि. 27 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात 21 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात 12 व ग्रामीण भागात 9 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
फलटण शहरात एकूण 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 5 महिन्यांचे बालक, 43 वर्षीय, 36 वर्षीय, 80 वर्षीय, 57 वर्षीय, 58 वर्षीय, 39 वर्षीय व इतर 3 पुरुष, 7वर्षीय बालिका,32 वर्षीय महीला यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागामध्ये कांबळेश्वर येथे 30 वर्षीय महिला, साखरवाडी येथे 65 वर्षीय महिला, वाघोशी येथे 23 वर्षीय पुरुष, निंबळक येथे 23 वर्षीय पुरुष, फरांदवाडी येथे 40 वर्षीय पुरुष, सरडे येथे 56 वर्षीय पुरुष, कोळकी येथे 57 वर्षीय पुरुष, रावडी बुद्रुक येथे 30 वर्षीय पुरुष, वडजल येथे 79 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
No comments