रुग्णवाहिका नसल्याचे कारण सांगून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला लावले चालत
![]() |
रिपाई आठवले गटाच्या वतीने तहसिलदार रमेश पाटील यांना निवेदन सादर करताना पदाधिकारी |
फलटण : उपजिल्हा रुग्णालय येथे शहरामधील हॉटेल कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली असता, तो रुग्ण पॉझिटीव्ह आला. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे कारण सांगुन त्या रुग्णाला रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना सेंटर पर्यंत चालत लावल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समजताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तहसिलदार रमेश पाटील यांना संबंधिताच्या चौकशीचे निवेदन देण्यात आले.
बाधीत रुग्ण रस्त्याने चालत असताना त्यांच्या संपर्कात अनेक लोक आले असतील किंवा येण्याची शक्यता नाकारता येत नाही . तर रुग्णाने भितीपोटी स्वत : च्या जीवाचा दगाफटका केला असता, भितीपोटी पळ काढला असता तर याला जबाबदार फक्त रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी असतील . अनेक निर्दोष लोकांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अन्यथा आर.पी.आय. आठवले गट रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.
यावेळी जिल्हा सचिव विजय येवले, जिल्हा सरचिटणीस मुन्ना शेख, मधुकर काकडे, राजु मारुडा, तालुका अध्यक्ष संजय निकाळजे, शहर अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे , सागर लोंढे, तेजस काकडे, सतिश अहिवळे, अमित येवले, प्रविण शेळके, सागर गायकवाड, दिपक अहिवळे, रणजित माने, बापु काकडे, निलेश अहिवळे, आनंद काकडे, नाना लोंढे, किशोर अहिवळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
No comments