फलटण तालुक्यात 25 कोरोना पॉझिटिव्ह; शहरात 2, ग्रामीण भागात 23

फलटण 30 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात एकूण 25 आणि माण तालुक्यातील 1 असे एकूण 26 व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये फलटण शहरात 2 रुग्ण व ग्रामीण भागात 23 व 1 मोगराळे ता. माण येथील रुग्णांचा समावेश आहे. जाहीर केलेले अहवाल हे दि. 29 रोजी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
दि. 29 रोजी नमुने घेऊन तपासणी केलेल्या कोविड चाचण्यांमध्ये फलटण येथे 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 32 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ग्रामीण भागात सोमंथळी येथे 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 35 वर्षीय, 62 वर्षीय, 20 वर्षीय, 55 वर्षे महिलांचा समावेश आहे.
वेताळ नगर व धुळदेव येथील 20 वर्षीय, 56 वर्षीय, 20 वर्षीय पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
नाईकबोमवाडी येथे 55 वर्षीय, 40 वर्षे पुरुष,53 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्यात पॉझिटिव्ह आल्या आहेत.
साखरवाडी येथे 40 वर्षीय महिला व एका पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
पिंपरद येथे 22 वर्षीय, 25 पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
विडणी येथे 27 वर्षीय, 40 पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
आदर्की खुर्द येथे 62 वर्षीय पुरुष, जाधववाडी येथे 37 वर्षीय महिला, बरड येथे 85 वर्षीय पुरुष, साठे फाटा येथे तीस वर्षीय पुरुष, राजाळे येथे 23 वर्ष पुरुष, सस्तेवाडी येथे 23 वर्ष पुरुष, पाडेगाव येथे 22 वर्षीय पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर मोगराळे तालुका माण येथील 25 वर्षे महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
No comments