दारू पिऊन टू व्हीलर चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल
फलटण 5 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम जन्मभूमी भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जिंती नाका चेक पॉईंट येथे बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांना, मलटण जिंतीनाका येथे एक दुचाकीस्वार वेडी वाकडी वळणे घेत आपले वाहन चालवत असल्याचे दिसले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारू पिल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी राम जन्मभूमी आयोध्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे बंदोबस्त लावण्यात आला होता सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान जिंती नाका, फलटण येथे, सागर अशोक जाधव राहणार जिंती नाका फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा हा आपल्या ताब्यातील होंडा सि डी डिलक्स मोटार सायकल MH11 CJ 6631 ही वेडी वाकडी चालवीत असल्याचे जिंती नाका येथील चेक पॉईंट वरील पोलिसांच्या निदर्शनास आले, म्हणून पोलिसांनी त्याला अटकाव केला असता, दुचाकीस्वाराने दारू पिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारू पिल्याचे समोर आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक शेंडे करीत आहेत.
No comments