Breaking News

विक्रीसाठी चालवलेली हातभट्टी दारू जप्त



            फलटण दि.  5 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  बारामती तालुक्यातून एकजण हातभट्टीची दारू दुचाकी वाहनावरून वाहतूक करीत, फलटण येथे विनापरवाना विक्रीसाठी आणत असताना पोलिसांनी मुद्देमालासह त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे सुमारे तीस लिटर हातभट्टीची दारू  सापडली आहे. 

        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7.45 वा. चे दरम्यान गणेश नगर, फलटण येथे चेतन बाळू  जाधव राहणार जेलसिंग रोड वेशी शेजारी माळेगाव जिल्हा पुणे, हा बारामती बाजूकडून फलटण बाजूकडे येणाऱ्या रोडवर त्याचे त्याब्यातील मोटारसायकल होंडा कंपनीची डिओ नं MH42 AT 2566 वरून पांढरे रगाचे कॅन मधून 30 लिटर काढिव हातभट्टी ची दारू आंबट गुलचट उग्र वासाची दारू मोटारसायकल वरून विना परवाना विक्री करणे करिता घेऊन जात असताना मिळून  आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जाधव याच्या ताब्यातील दिवो ही दुचाकी तसेच तिथे तर दारू पक्यान पोलिसांनी जप्त केली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक बोडरे करीत आहेत.
 

No comments