Breaking News

सातारा जिल्ह्यात 62 नागरिकांना आज डिस्चार्ज; 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू


            सातारा दि. 5-:जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 450 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये
        कराड तालुक्यातील  कापील  येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, कालवडे येथील 30 वर्षीय महिला. खंडोबानगर (मलकापूर) येथील 4 वर्षीय बालक, वडगाव हवेली येथील 43 वर्षीय पुरुष.,

            पाटण तालुक्यातील   नेरले येथील 23 वर्षीय पुरुष., कासरुंड येथील 12, 17 वर्षीय युवती व 35 वर्षीय महिला., निगडे येथील 45 वर्षीय पुरुष.,

            वाई तालुक्यातील   वेळे येथील 40 वर्षीय महिला.,

        सातारा तालुक्यातील   कण्हेर येथील वय 22, 40, 40, 34, 90, 40, 25, 62, 30, 54, 18,40, 37 वर्षीय महिला व वय   51, 50, 40, 56, 55, 7, 22, 11, 36, 5, 57, 16, 12, 16, 65 वर्षीय पुरुष., तामजाईनगर सातारा येथील 44 वर्षीय महिला., लक्ष्मी टेकडी येथील वय 56, 18, 7, 42 वर्षीय महिला व वय 42, 35 वर्षीय पुरुष., सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 44, 20, 42 वर्षीय महिला व 47, 19, 38,54 वर्षीय पुरुष.,  रामकुंड येथील 10 वर्षीय बालक, प्रतापगंज पेठेतील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 29 वर्षीय महिला व 32 वर्षीय पुरुष.,

महाबळेश्वर तालुक्यातील  गोडवली येथील  23, 38 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष.,

जावली तालुक्यातील   सायगाव येथील 36 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला.,

फलटण तालुक्यातील फलटण शहरातील गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष,

 450 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

                क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 32, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 86, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  30, कोरेगांव 4, वाई येथील 29, खंडाळा येथील 80, पानमळेवाडी 21,  महाबळेश्वर 6, पाटण 13, दहिवडी 36, खावली 55, कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 58 असे एकूण  450 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

 2 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

        कराड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये  रविवार पेठेतील कोरोनाबाधित 62 वर्षीय पुरुषांचा  व सातारा येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतलेल्या खटाव ता. खटाव येथील कोरोनाबाधित 75 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाले आहेत. त्यांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी  करण्यात आलेले अहवाल हे कोरोनाबाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहितीही  डॉ. गडीकर यांनी  दिली.

घेतलेले एकूण नमुने 30812

एकूण बाधित 780

घरी सोडण्यात आलेले 2349

मृत्यू 152

उपचारार्थ रुग्ण 2279

 

No comments