Breaking News

99 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 255 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

         सातारा दि. 29 -:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 99  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 255  जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

       विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 12, कराड तालुक्यातील 7, खंडाळा तालुक्यातील 26, खटाव तालुक्यातील 2, कोरेगांव तालुक्यातील 3, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 5, पाटण तालुक्यातील 2, सातारा तालुक्यातील 20, वाई तालुक्यातील 19 असे एकूण 99 नागरिकांचा समावेश आहे.
  255 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
          स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय फलटण 35, खंडाळा 50,  रायगांव 44, मायणी 70, महाबळेश्वर 40, असे एकूण 255 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.

 घेतलेले एकूण नमुने -   44378

एकूण बाधित -  13508

घरी सोडण्यात आलेले -  7208

मृत्यू - 382

उपचारार्थ रुग्ण - 5918

             


No comments