Breaking News

फलटण येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

 

        फलटण दि 30 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -  टेलिफोन कॉलनी स्वामी विवेकानंद नगर फलटण येथील विवाहित 50 वर्षीय महिलेने घरातील छतास साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, टेलीफोन कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर फलटण येथील विवाहिता प्रमिला अरुण लांडगे वय वर्ष 50, यांनी शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 4 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान राहते घरात, साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची फिर्याद पती अरुण महादेव लांडगे यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार गार्डी करीत आहेत.


No comments