छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी अग्रिमा जाशुआ व सौरव घोष यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची फलटण येथे मागणी
![]() |
| उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे मागणीचे निवेदन देताना आ. दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, ॲड संदीप लोंढे व इतर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) - अग्रिमा जाशुआ, सौरव घोष व स्टॅण्डअप कॉमेडी या चॅनेलच्या दिगदर्शक, निर्माता यांचेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरले बद्दल व संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल तसेच धार्मिक भावनांना ठेच पोहचवल्या बद्दल गुन्हा दाखल करणेत यावा, अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवेदनाद्वारे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्याकडे केलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असुन तमाम हिंदु धर्मियांचे श्रध्दा स्थान आहेत. फलटणचे नाईक निंबाळकर राजे घराणे हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी संबंधीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती सईबाई महाराणी या फलटणच्या नाईक निंबाळकर या राज घराण्यातीलआहेत अग्रिमा जाशुआ व सौरव घोष यांनी स्टॅण्डअप कॉमेडी या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल अपशब्द वापरून ते युट्युब व अनेक सोशल माध्यमातुन प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये अग्रिमा जाशुआ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्या बद्दल अत्यंत खालच्या स्तराला जावुन टिपणी केली आहे व सौरव घोष याने देखील स्टैंड अप कॉमेडी याच कार्यक्रमामध्ये विमानतळाचे नावाचे विषयावरून अपशब्द वापरलेले आहेत. प्रसिद्धीमाध्यमाद्वारे कार्यक्रम प्रसिध्द करून या दोघांनी संपुर्ण महाराष्ट्राच्या व तमाम हिंदु धर्मियांच्या भावना दुखवल्या आहेत. त्या बद्दल त्यांच्या विरुद्ध फलटण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करावा अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे म्हणुन जगामध्ये प्रसिध्द व पुजनीय आहेत. त्यांच्या कार्य व बलिदानावर आजचा महाराष्ट्र उभा आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर अत्यंत खालच्या स्तराला जावुन अपशब्द वापरले ते स्वताच्या फायद्यासाठी प्रसिध्द करणे असे कृत्य अग्रिमा जाशुआ व सौरव घोष यांनी केले आहे. असे कृत्य करून त्यांनी संपुर्ण महाराष्ट्राच्या तसेच तमाम हिंदु धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचवली आहे. तसेच अशा प्रकारचे गैर शब्द वापरून दोन वर्गीयांमध्ये तेड निर्माण होणे, धार्मिक भावनांना ठेच पोहचवणे असा गुन्हा केलेला आहे .
तरी अग्रिमा जाशुआ, सौरव घोष व स्टॅण्डअप कॉमेडी या चॅनेलच्या दिगदर्शक, निर्माता यांचेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरले बद्दल व संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल तसेच धार्मिक भावनांना ठेच पोहचवल्या बद्दल गुन्हा दाखल करणेत यावा, अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे जेष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, अॅड. संदीप लोंढे यांनी निवेदनाद्वारे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्याकडे केलेली आहे.

No comments