फलटण नगर पालिका लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण नगर परिषद मध्ये काम करणाऱ्या महिलेस वारंवार त्रास देऊन असभ्य वर्तन करणार्या नगर परिषद लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास नगर पालिका लिपिक विजय मारुडा रा. स्वामी विवेकानंदनगर, फलटण हा दि. 31 मे 2020 ते 10 जुलै 2020 दरम्यान वारंवार त्रास देऊन, असभ्य वर्तन करून पीडित महिलेला लज्जा उत्पन्न करत होता. तिचा मोबाईल घेऊन तिला, तू कोणाशी बोलते? कोणाशी चॅटिंग करते? ते मला बघायचे आहे, असे म्हणून वाईट हेतूने उजवा हात धरून, मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून हाताने मारहाण व शिवीगाळ केली असल्याची फिर्याद पीडित महिलेने फलटण पोलीस स्टेशनला दिली असून, त्यानुसार मारुडा याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments