Breaking News

संगमनेर येथे ६ ऑक्टोबरला राज्यस्तरीय सोनार समाज वधू-वर परिचय मेळावा

State-level Sonar Samaj bride-groom introduction meet to be held on October 6th at Sangamner

    फलटण (प्रतिनिधी) : सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी संगमनेर येथील अमृता लॉन्स, घुलेवाडी फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

    या मेळाव्याचे उद्घाटन श्री क्षेत्र आळंदी येथील रामायणाचार्य ह.भ.प. साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे आणि संगमनेर येथील प्रसिद्ध सराफ दत्तात्रय मैड यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुवर्ण नागरी सहकारी पतसंस्था, संगमनेरचे चेअरमन विजयकुमार डहाळे असणार आहेत. तसेच नाशिकचे पुरवठा निरीक्षक डॉ. वेदांत राजेंद्र कपोते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

    सुवर्णकार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना एकमेकांची ओळख करून घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा सुवर्णकार समाजातील वधू-वरांनी व त्यांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    या मेळाव्याच्या आयोजनासाठी मीनाताई सोनार, अनिता शहाणे, गीताताई नवसे, सुरेखाताई लोळगे, स्वातीताई मुंडलिक, माधुरीताई माळवे, जयाताई कुलथे, अनिताताई दारवेकर तसेच भगवान शहाणे, गोपाळ कुलथे, संदीप उदावंत, श्रीकांत जोजारे, बबनराव कुलथे, रवी माळवे, संग्राम मयूर, राजेंद्र कुलथे, मनोज पळसकर आणि योगेश शहाणे आदी प्रयत्नशील आहेत.

No comments