Breaking News

अनर्थ टळला! बाप्पांची मूर्ती पडताना वाचली; विसर्जनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Disaster averted! Bappa's idol survives fall; Question mark over immersion arrangements

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - गणेश विसर्जनाच्या दिवशी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने क्रेनच्या साह्याने गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, क्रेनमध्ये न बसणाऱ्या गणेशमूर्तींकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

    मोठ्या गणेश मूर्तीसही क्रेनची सुविधा उपलब्ध नसल्याने एका मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशमूर्ती उचलून कॅनलपर्यंत न्यावी लागली. मूर्ती नेत असताना ती खाली पडण्याची परिस्थिती निर्माण झाली; मात्र कार्यकर्त्यांनी वेळीच मूर्ती सावरल्याने मोठा अनर्थ टळला.

    यानंतर गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित करण्यात आली. या प्रकारामुळे गणेशमूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेबाबत प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याची मागणी नागरिक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

    क्रेनमध्ये न बसणाऱ्या मूर्तींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था का करण्यात आली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

No comments