Breaking News

सेवा संकल्प अभियान -फलटण येथे अंगणवाडी बालकांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

Seva Sankalp Abhiyan - Distribution of educational materials and food to Anganwadi children in Phaltan

     सातारा दि १ : सातारा नागरी पश्चिम प्रकल्पांतर्गत सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने फलटण मधील अंगणवाडी क्रमांक १४३, श्री साई अंगणवाडी येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
    यावेळी अंगणवाडीतील बालकांच्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी २५ पाट्या, एबीसीडी पाटी, विविध पझल्स तसेच प्राण्यांच्या चित्रांचे पझल्स असे शैक्षणिक साहित्य अंगणवाडीला देण्यात आले. तसेच उपस्थित बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले.
    अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments