Breaking News

जिल्हा बँक निवडणुकीसाठी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Ranjitsinh Naik Nimbalkar's nomination papers filed for the district bank elections

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातून आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार धैर्यशीलदादा कदम यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नागरी सहकारी पतसंस्था मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्ज दाखल करताना उपस्थित मान्यवर आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उमेदवारीकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

No comments