Breaking News

सोनगाव बंगला येथे ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

42-year-old man dies at Songaon Bungalow

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० : फलटण तालुक्यातील सोनगाव बंगला येथे राहत्या घराच्या पाठीमागील परिसरात ४२ वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याची घटना शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    भाऊसो गणपत हजार (वय ४२, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) हे घराच्या पाठीमागील परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर कुटुंबीय व उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी अंदाजे ७.१५ वाजता त्यांना मृत घोषित केले.

No comments