युवा महोत्सवात यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचा मुधोजी महाविद्यालयात गौरव सोहळा संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ : मुधोजी महाविद्यालयात कलाविष्कार विभागातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्राचार्य डॉ . पी . एच .कदम सरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित ४६ व्या जिल्हा व मध्यवर्ती युवा महोत्सवात यशस्वी झालेल्या व सहभागी विद्यार्थी कलाकारांचे प्राचार्य डॉ .पी . एच .कदम सर , प्राचार्य डॉ .राजेंद्र मोरे , अध्यक्ष , सातारा इतिहास संशोधन मंडळ ,प्राचार्य छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा , प्राचार्य डॉ .विजयराव नलवडे डॉ . जयपाल सावंत यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला . लोकसंगीत वाद्यवृंद कलाप्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थी , प्रणव आवटे ,भाऊसाहेब पाटील , चैत्राली करे , पूर्वा निकम , स्वरूप गेजगे, सनी जगताप , या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.लोककला मध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त विद्यार्थी राम भोसले , प्रणव आवटे, धरती भोसले , वैष्णवी कांबळे , ऐश्वर्या गायकवाड , ऐश्वर्या कोंढाळकर, प्रतिक्षा रिते , अनुष्का पवार यांचा सत्कार प्राचार्य नलवडे सरांच्या शुभहस्ते करण्यात आला . पश्चिमात्य एकलवादन स्पर्धेत चतुर्थ क्रमांक प्राप्त राम भोसले तर एकल वाद्यवादन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे यश मिळवलेल्या प्रणव आवटे , नकला मध्ये चतुर्थ क्रमांक प्राप्त आदित्य रणदिवे चा सत्कार प्राचार्य प्रो.डॉ . पी . एच.कदम सरांनी केला. मूकनाट्य स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे धरती भोसले , आदित्य वाघमारे , आदित्य रणदिवे ,ऐश्वर्या गायकवाड , सुशांत ससते ,सुजल जगताप यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .शॉर्ट फिल्म मध्ये तृतीय क्रमांकाच्या यशाबद्दल आदित्य वाघमारे , साहिल गार्डे , काजल चव्हाण , आदित्य रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला . इंग्लिश वक्तृत्वमध्ये संस्कृती कोकरे हिने यश प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला . तसेच पथनाट्य , पश्चिमात्य समूहगीत , सांघिक रचना , भारतीय समूहगीत , एकांकिका , प्रहसिका स्पर्धेत यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या गौरव समारंभाबरोबरच कलाविष्कार विभागप्रमुख , प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर, प्रा . विशाल गायकवाड , प्रा .मयूर शितोळे , प्रा .सचिन दोशी , प्रा .प्रियांका देशमुख , प्रा . डॉ .मृणालिनी चव्हाण यांचाही सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला . या गौरव व कौतुक समारंभप्रसंगी , विद्यार्थी विकास विभाग , संचालक प्रा . डॉ . अशोक शिंदे ,प्रसिद्धी प्रमुख प्रा .डॉ .प्रभाकर पवार , प्रबंधक आर. वाय .गायकवाड उपस्थित होते . विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यामध्ये कार्यप्रेरणा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने हा गौरव सोहळा फार महत्वाचा असतो.

No comments