Breaking News

गिरवी येथे वर्षावास प्रवचनमालिका समारोप समारंभाचे आयोजन; २४ तास महापरित्राण पाठासह धम्मप्रवचन, बुद्धपूजा व धम्मदान कार्यक्रम

Closing ceremony of Varshavasa sermon series organized at Girvi; 24-hour Mahaparitran recitation along with Dhamma sermon, Buddha worship and Dhamma donation program

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 24 : सिद्धार्थ तरुण मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा कार्यकारिणी शाखा, गिरवी यांच्या वतीने वर्षावास प्रवचनमालिका समाप्ती समारंभाचे आयोजन शनिवार, दि. २४ आणि रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. गिरवी येथील संबोधी बुद्ध विहार येथे हा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.

    या कार्यक्रमाला नागपूर येथील भिक्खू आनंदबोधी महाथेरो, बोधगया येथील भिक्खू कोंडिण्य महाथेरो आणि भिक्खू माझी महाथेरो यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.

    शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भिक्खूजींचे स्वागत, सकाळी १०.३० वाजता भोजन आणि ११ वाजता चंक्रमण फेरी होईल. दुपारी १२ वाजता बुद्धपूजा व २४ तासांच्या महापरित्राण पाठाला सुरुवात होणार आहे.

    रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महापरित्राण पाठाची समाप्ती व बुद्धपूजा होईल. त्यानंतर भिक्खूजींचे भोजन, धम्मप्रवचन, आशीर्वाद आणि धम्मदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी उपस्थितांना धम्मविचारांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

    या समारंभासाठी गिरवी व परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिद्धार्थ तरुण मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा कार्यकारिणी शाखा, गिरवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments