सातारा जिल्हा बँक निवडणूक : सुरेश गायकवाड यांचा दीपकराव चव्हाण यांना जाहीर पाठिंबा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 24 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून उमेदवारी करणारे सुरेश गायकवाड यांनी माजी आमदार दीपकराव चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. फलटण येथे झालेल्या या घडामोडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, खटके वस्तीचे सरपंच बापूराव गावडे, कोळकी ग्रामपंचायतीचे सदस्य अक्षय गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेश गायकवाड यांनी दीपकराव चव्हाण यांना दिलेल्या जाहीर पाठिंब्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

No comments