Breaking News

रेश्माताई भोसले यांची सातारा जिल्हा शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड

Reshma Bhosale elected as Satara District Shiv Sena Mahila Aghadi District President

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २५ जुलै : फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या रेश्माताई राजेंद्र शामराव भोसले यांची शिवसेना महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    रेश्माताई भोसले यांनी पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात विविध विकासकामांबरोबरच सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

    त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. रेश्माताई भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात महिला आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

No comments