Breaking News

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता - जिल्हाधिकारी संतोष पाटील

Punyashlok Ahilyadevi Holkar Debt Relief Scheme successfully implemented in the district, second list likely to be published before August 15 - District Collector Santosh Patil

    सातारा दि. 31 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात पारदर्शक व गतीने अंमलबजावणी सुरू असून योजनेची दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 52 हजार 662 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या यादीत 31  हजार 556  पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा माफीची रक्कम कमी असणार नाही. या योजनेअंतर्गत नियमानुसार एकरकमी सेटलमेंट   करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे.

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती  योजनेबाबत कोणतीही अस्पष्टता राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व बँकांमध्ये योजनेचे माहिती फलक लावण्यात आले आहेत.   ज्या मयत शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज होते, त्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज खाती वारसांच्या नावावर वर्ग करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

    बँकांना शेतकऱ्यानं नव्याने कर्ज वितरणासाठी पात्र करण्याच्या बँकांना सूचना दिल्या आहेत. तसेच वारसाना कर्ज मुक्तीचा  लाभ होण्यासाठी वारसा प्रमाणपत्र तातडीने देण्याच्या तलाठी यांना निर्देशही देण्यात आले आहेत.

    जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के ॲग्रीस्टॅक पूर्ण झाले असून  अजूनही सुमारे 4 हजार 812  शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक झालेला नाही. शासकीय योजनांचा लाभ सुरळीत आणि थेट मिळण्यासाठी जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

No comments