Breaking News

संततधार पावसामुळे फलटण येथील जिल्हास्तरीय कनिष्ठ गट ॲथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

District level junior group athletics competition in Phaltan postponed due to incessant rains

    फलटण, दि. ३१ जुलै (गंधवार्ता): फलटण तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे स्पर्धेच्या मैदानात पाणी साठले असून ग्रामीण भागातून येणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेता, दि. १ ऑगस्ट रोजी फलटण येथे आयोजित करण्यात आलेली सातारा जिल्हास्तरीय कनिष्ठ गट मैदानी अजिंक्यपद स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

    सातारा जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशनने ही माहिती दिली असून, स्पर्धेची नवीन तारीख दोन दिवस अगोदर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

    असोसिएशनने सर्व प्रशिक्षक, शिक्षक व खेळाडूंना या बदलाची नोंद घेण्याचे तसेच आपल्या खेळाडूंना याबाबत तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

No comments