Breaking News

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अभियान; फलटण नगरपरिषदेत २८ जुलै रोजी वॉर्ड सभांचे आयोजन

Special Brief Revision Campaign; Ward meetings organized in Phaltan Municipal Council on July 28

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा)दि.२७ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) अभियानांतर्गत फलटण नगरपरिषदेच्या वतीने मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत बीएसएनएल कार्यालयाशेजारील नगरपरिषदेच्या सभागृहात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

    या सभांमध्ये संबंधित प्रभागातील गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांची भागनिहाय यादी वाचून दाखविण्यात येणार असून, नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

    मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने प्रत्येक प्रभागातील ASDD मतदारांची भागनिहाय यादी तयार करण्यात आली असून, या उपक्रमासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

    फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिक तसेच बीएलए यांनी आपल्या प्रभागातील वॉर्ड सभेला उपस्थित राहून मतदार यादी शुद्धीकरणाच्या या महत्त्वपूर्ण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. अचूक आणि अद्ययावत मतदार यादी हा सक्षम लोकशाहीचा पाया असल्याने या अभियानास सर्वांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

No comments