कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ : फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील रहिवासी, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे माजी चेअरमन तथा माजी आमदार कै. चिमणराव कदम यांचे निकटवर्तीय सहकारी पोपटराव मारुती काकडे (आण्णा) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
पोपटराव (आण्णा) काकडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी उल्लेखनीय कार्य केले. सहकार क्षेत्रातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावत अनेक वर्षे जनसंपर्क जपला. शांत, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारा स्वभाव असल्याने ते सर्व स्तरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय होते.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी २ वाजेपर्यंत फलटण येथील जाधववाडी येथील निवासस्थानी ठेवल्यानंतर पार्थिव त्यांच्या मूळ गावी हिंगणगाव (ता. फलटण) येथे नेण्यात आले, त्यांच्यावर दुपारी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोपटराव (आण्णा) काकडे यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय, सामाजिक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

No comments