Breaking News

धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल; सचिनराव अभंग यांची पुढाकारातून भाविकांना दिलासा

Historic change in Dhuldev Yatra; Sachinrao Abhang's initiative brings relief to devotees

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ - फलटण तालुक्यातील धुळदेव यात्रेत यंदा एक ऐतिहासिक आणि उल्लेखनीय बदल पाहायला मिळाला. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेत दरवर्षी लाखो भाविकांची उपस्थिती असते, मात्र मूलभूत सुविधांचा अभाव कायम जाणवत होता. यंदा विडणी गणाचे नूतन पंचायत समिती सदस्य तथा अध्यक्ष सचिनराव अभंग यांनी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली धुळदेव यात्रेत मोठा बदल घडवून आणला.

    वर्षानुवर्षे भाविकांना अंधारात यात्रा पार पाडावी लागत होती, तसेच महिला भाविकांसाठी स्नानाची योग्य सोय नव्हती. या सर्व समस्यांची दखल घेत अध्यक्ष अभंग यांनी स्वतः मैदानात उतरून काम हाती घेतले.

    यात्रा परिसरात हॅलोजन लाईट्स बसवून संपूर्ण परिसर उजळून टाकण्यात आला. यामुळे रात्रीची यात्रा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाली. तसेच, महिला व इतर भाविकांसाठी शॉवरसह तात्पुरती स्नान व्यवस्था उभी करण्यात आली. विशेष म्हणजे ही व्यवस्था अध्यक्षांनी स्वतःच्या खर्चातून उभारल्याची माहिती मिळाली आहे.

    अचानक झालेल्या या सकारात्मक बदलामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र अध्यक्ष सचिनराव अभंग यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. “अध्यक्ष म्हणजे काम आणि काम म्हणजे अध्यक्ष” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

    या उपक्रमामुळे विडणी गणातील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, आगामी काळातही अशाच धडाकेबाज कामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments