Breaking News

बाजारपेठेतील अतिक्रमणावर फलटण नगरपालिकेची धडक कारवाई ; शहरातील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने काढणार - मुख्याधिकारी निखिल जाधव

Phaltan Municipality takes strong action against encroachments in the market; Encroachments in the city will be removed in phases - Chief Officer Nikhil Jadhav

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१८ फेब्रुवारी २०२६ - शहरातील बाजारपेठ व मुख्य रस्त्यालगत असणारे फळ विक्रेते व भाजी विक्रेते यांच्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमनची वाहने बाजारपेठेत जाणे मुश्किलीचे झाले होते तसेच काही दिवसापूर्वीच रविवार पेठ बाजारपेठेत आगीची दुर्घटना घडली त्यावेळी अग्निशामनची वाहने आत मध्ये जाऊ शकली नाहीत, या पार्श्वभूमीवर आपण येथील फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांना अतिक्रमणे काढण्याबाबत नोटीस बजावली होती व अनाउन्स देखील केले होते, त्यानुसार आज बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्पष्ट केले. तसेच येथून पुढील काळात देखील ही कारवाई चालू राहणार असून फलटण शहरातील सर्व रस्ते मोकळे ठेवावेत असे आवाहन फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांना मुख्याधिकारी यांनी केले.

    शहरातील इतर अतिक्रमणाबाबत प्रश्नावर बोलताना मुख्याधिकारी जाधव म्हणाले की, आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्यास तसेच रस्त्यावर अडथळे होणारी अतिक्रमणे आम्ही टप्प्याटप्प्याने काढणार असल्याचे सांगितले.

    फलटण शहराततील मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत असणारी अतिक्रमणे काढल्यानंतर आज फळ विक्रेते व भाजी विक्री त्यांना मार्किंग करून त्यामध्येच आपला हातगाडा किंवा दुकान लावण्याचे सांगितले असून रात्री आपापली दुकाने काढून घेण्याच्या सूचना नगरपालिकेने फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांना दिल्या आहेत.

No comments