फलटण शहरातील दोघांना २ वर्षाकरीता केले तडीपार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - सातारा जिल्हयामधील फलटण शहर परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे सातत्याने गुन्हे करणारे सराईत टोळीचा प्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे, वय २२ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिरा शेजारी, मलठण, फलटण, ता. फलटण, जि. सातारा. तसेच टोळीचा सदस्य अर्जुन राजु जाधव, वय १९ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिरा शेजारी, मलठण, फलटण, ता. फलटण, जि. सातारा यांचे टोळीवर दुखापत पोचवणे, विनयभंग करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, चोरी करणे यांसारखे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने, फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.अरविंद काळे, पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपूर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतुन सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन ०२ वर्षे कलावधीकरीता हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग सातारा यांनी केली होती.
फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर अवैध मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन दुखापत पोचवण्यासह, चोरी करणे, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, विनयभंग करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण शहर व फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीचर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतुन त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
मा. तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळीचा प्रमुख अनिकेत सुभाष बनसोडे, वय २२ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिरा शेजारी, मलठण, फलटण, ता. फलटण, जि. सातारा. तसेच टोळीचा सदस्य अर्जुन राजू जाधव, वय १९ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिरा शेजारी, मलठण, फलटण, ता. फलटण, जि. सातारा यांची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये संपुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन तसेच पुणे जिल्हयातील बारामती, पुरंदर तालुका हद्दीतुन सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका हद्दीतुन ०२ वर्षे कलावधीकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस फलटण शहर पो.स्टे कडील पो.कॉ जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

No comments